सिंधुदुर्गात कावळा मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ जिल्ह्यात भीतीचे वातावरण

0
192

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील बांदा शहरात आज स्मशानभूमीनजीक कावळा मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. देशात कोरोना साथीच्या पाठोपाठ बर्ड फ्ल्यूची साथ आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बांदा शहरात आढळला कावळा

बांदा शहरात आज सकाळी खेमराज प्रशालेच्या नजीक असलेल्या स्मशानभूमी रस्त्यावर कावळा मृतावस्थेत आढळला आहे. मात्र याबाबत वनविभाग व स्थानिक प्रशासनाला कोणतीही कल्पना नव्हती. दोन दिवसांपूर्वी तेरेखोल नदीपात्रानजीक देखील दोन कावळे मृतावस्थेत आढळल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. बर्ड फ्ल्यू साथीच्या पार्श्वभूमीवर कावळे मृतावस्थेत आढळण्याच्या घटना वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्याचे विच्छेदन करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात खळबळ

सध्या राज्यात कोरोना नंतर बर्ड फ्ल्यूची साथ आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चिकन व्यवसाय धोक्यात आला आहे. जिल्ह्यात अद्याप या रोगाची पुष्टी झाली नसल्याने चिकन व्यवसाय ठेवढासा प्रभावित झालेला नाही. मृत कावळा सापडल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here