सिंधुदुर्ग – जिल्ह्यात होणारी संभाव्य ढगफुटी लक्षात घेता एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. सावंतवाडी आणि कुडाळ या ठिकाणी हि पथके तैनात करण्यात आली आहेत.
कुडाळ येथे या पथकाने कर्ली नदीच्या किनाऱ्यासह कुडाळ शहरातील भंनसाळ नदीच्यालगत असलेला परिसर तसेच माणगाव खोऱ्यातील आंबेरी पूल याची पाहणी केली त्यांच्यासमवेत कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख राय उपस्थित होते.
सावंतवाडी येथेही एक पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने कर्ली नदीच्या किनाऱ्यासह कुडाळ शहरातील भंनसाळ नदीच्यालगत असलेला परिसर तसेच माणगाव खोऱ्यातील आंबेरी पूल याची पाहणी केली त्यांच्यासमवेत कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख राय उपस्थित होते.



