सिंधुदुर्गातील शिवसेना आमदार वैभव नाईक कोरोना पॉझिटीव्ह जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ

0
333

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आमदार वैभव नाईक यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह मिळाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

आज सोमवारी सकाळी जिल्ह्यातील काही लोकांचे स्वाब नमुने घेण्यात आले होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांचाही स्वाब घेण्यात आला होता. आज सायंकाळी उशिरा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी दौरा केला होता. यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. विशेषतः पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत वैभव नाईक हे दौऱ्यात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही चांगलीच हादरली आहे. दरम्यान आमदार नाईक हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती सिव्हिल सर्जन डाॅक्टर धनंजय चाकोरकर यांनी मीडियाला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here