केरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना इन्सुली तपासणी नाक्यावरून पथकाच्यावतीने गोव्यात माघारी पाठविले. गुरुवारी सुमारे 14 विदेशी पर्यटकांना जिह्यात येत असताना परतवून लावण्यात आले. यातील 12 पर्यटकांना बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाक्यावरून तर दोन पर्यटकांना पत्रादेवी येथील पथकाने माघारी पाठविले. तर दिवसभरात इतर जिह्याबाहेरील गाडय़ामधील सुमारे 60 जणांची तपासणी करून त्यांची नोंद आरोग्य विभागाच्या पथकाने आपल्याकडे घेतली आहे.
जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यांचे रुग्ण महाराष्ट्रातही आढळण्यास सुरुवात झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने जिह्यात येणाऱया व जिह्यातून जाणाऱया पर्यटकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रत्नागिरी येथे कोरोनाची लागण असलेला रुग्ण सापडल्याने शुक्रवारी सकाळपासून गोव्याच्या सीमेलगत असलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने विदेशी पर्यटकांना जिह्यात येण्यासाठी मनाई केली. याबाबत बांदा पोलिसानेही त्यांना सहकार्य केले. इन्सुली येथील तपासणी नाक्यावर एका रशियन पर्यटकाला तपासणीसाठी थाबंविण्याचा इशारा केला असतानाही त्यांने तेथून पळ काढली. मात्र, डय़ुटीवर असलेल्या कर्मचाऱयांने मागाहुन जात त्याला सूचना देत गोव्यात पाठविले. शुक्रवारी दिवसभरात येथील इन्सुली तपासणी नाक्यावर पुणे, कोल्हापुर, मुबंई या भागातील सुमारे 39 पर्यटकांना थाबंवुन विचारणा केली. तर 12 विदेशी पर्यटकांची तपासणी करून त्यांना गोव्यात माघारी पाठविण्यात आले. या पथकात डॉ. विवेकानंद खोडवे व आरोग्य सेवक साईस्वरुप यांनी काम केले. पत्रादेवी येथील पथकाने दिवसभरात सुमारे 26 पर्यटकांची तपासणी करत दोन विदेशी पर्यटकांना माघारी गोव्यात परतवून लावले. या पथकात डॉ. संजय चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल आर. पी. तेली, ज्योती हरमलकर यांचा पथकात समावेश आहे.
सदरचे वैद्यकीय पथक हे दिवसभर राहणार असून त्यानंतर विदेशी पर्यटक महामार्गावर आढळल्यास त्यांना लागलीच बांदा प्राथमिक आरोग्य केद्रात दाखल करण्यात यावे, अशा सूचना दिल्या असल्याचे बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सांगितले.