सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथील मुंतजिमा कब्रस्तान कमिटीच्या कब्रस्तान परिसरात नमाज पडण्यासाठी जागा उपलब्ध करून घ्या,तसेच कच्चा रस्त्याचे डांबरीकरण करा,अशी मागणी कमिटीच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली..दरम्यान याबाबत आपण लवकरात-लवकर निधी उपलब्ध करून देऊ,असे आश्वासन श्री.सामंत यांनी दिले.आज कब्रस्तान कमिटीचे पदाधिकाऱ्यांनी आकेरी येथील विश्रामगृहावर त्यांची भेट घेतली. यावेळी कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष तौकिर शेख,उपाध्यक्ष मुजीब शेख,सचिव परवेज बेग,खजिनदार सोहाब बेग, सल्लागार हिदायतुल्ला खान,सदस्य अल्ताफ मुल्ला, इरफान शेख,जावेद शहा,बसित पडवेकर,अरिफ करोल उपस्थित होते.