सिंधुदुर्ग – जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदान केंद्रावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते व पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. मतदान केंद्राच्या परिसरात झालेली कार्यकर्त्यांची गर्दी हटवताना हा प्रकार घडला. दरम्यान आम्ही योग्य ते सहकार्य करीत आहोत, त्यामुळे पोलिसांनीच शांततेत घ्यावे, असे काँग्रेसचे जेष्ठ नेते विकास सावंत यांनी यावेळी सांगितले.
तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्या पहिल्यांदा हटवाव्यात, नंतरच आम्हाला या ठिकाणावरून बाजूला करावे, असे तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेसाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात मतदान प्रक्रिया सुरू असताना परिसरात महा विकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
यावेळी त्या ठिकाणी जात पोलिसांनी ती गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न केला. यात कार्यकर्ते व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वेळी पहिल्यांदा भाजपा पदाधिकाऱ्यांनी रस्त्यात उभ्या केलेल्या गाड्या हटवा, आणि नंतरच आम्हाला या ठिकाणावरून बाजूला करा, असे महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या सर्व प्रकारानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान आम्ही योग्य ते सहकार्य करीत आहोत, त्यामुळे पोलिसांनीच आपली भूमिका शांततेत घ्यावी, असा सल्ला श्री. सावंत यांनी दिला.