सिंधुदुर्ग – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणाने तळ गाठला आहे त्यामुळे पाऊस वेळेत न झाल्यास शहरात पाणी टंचाई होवू शकते अशी भीती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली आहे.काल संकष्टी असल्याने श्री साळगावकर हे पाळणे कोंड येथील सिद्धिविनायक मंदिरात गेले होते यावेळी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन धरणातील पाणी साठयाची पाहणी केली. याबाबत त्यांनी छायाचित्रासह माहिती दिली आहे. या ठिकाणी अद्याप पर्यंत पाऊस न झाल्यामुळे शहराला पाणी टंचाईच्या सामोरे जावे लागणार आहे अशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी झाली होती त्यावेळी 15 जुलैपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करावा लागला होता असे त्यांनी म्हटले आहे