सामाजिक कार्यकर्ते स्व. विजयराव नाईक यांचा सहावा स्मृतिदिन साजरा

0
257

सिंधुदुर्ग – जिल्ह्याच्या जडणघडणीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे स्व. विजयराव नाईक यांचा सहावा स्मृतिदिन शिरवल विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले.

स्मृतिदिनानिमित्त विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना बिस्कीट,तसेच प्रोटीनयुक्त खाद्य वस्तू त्याचप्रमाणे कोविड सेंटरसाठी पीपीई किट, फेसशिल्ड या वस्तूंचे वाटप शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच कणकवली विजयभवन कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिण्यात आली.

याप्रसंगी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, राजू राणे, सतीश नाईक, नगरसेवक सुशांत नाईक,संकेत नाईक, राजू राठोड, भास्कर राणे,रूपेश आमडोस्कर,भूषण परुळेकर,निसार शेख, महेश देसाई, अनिल नाईक, गणेश राणे, फार्मसी कॉलेजचे रमण बाणे, मंदार सावंत आदींसह कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here