सरस्वती सामाजिक विकास केंद्र अंतर्गत शिक्षक-प्रबोधन मालिकेचा शुभारंभ

0
309

 

पणजी – “सरस्वती सामाजिक विकास केंद्र” नावाने सुरु करण्यात येणाऱ्या आपल्या महत्वाकांक्षी शैक्षणिक- सामाजिक प्रकल्पाच्या पूर्वतयारीच्या टप्प्यातील, शिक्षक-प्रबोधन मालिकेचा शुभारंभ,श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. राज्य संरक्षक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी मार्गदर्शन केले. स्वागथ व प्रास्ताविक विद्याभारती गोवा चे कार्याध्यक्ष प्राचार्य गजानन मांद्रेकर यानी व समारोप अध्यक्ष डाॅ. सीताराम कोरगावकर यांनी केला.

शांता हायस्कूल सडये, शिवोली, पीपल्स हायस्कूल, कामुर्ली व श्रीगणेश उच्च माध्यमिक, अशा तीन शाळांच्या समूहातील शिक्षक/मुख्याध्यापकांसाठी सदर प्रबोधन वर्ग , विद्याभारती गोवा ने योजला होता. उत्तर व दक्षिण गोव्यातील अन्य तीन समूहातील शिक्षकांचे प्रबोधन वर्ग ऑगस्टमध्ये पूर्ण करण्यात येतील.

शाळांतील विद्यार्थी समाजाभिमुख व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व सामाजिक,कौटुंबिक कर्तव्यांची जाणीव असलेले असावे, या दृष्टीने विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच समाजात मिसळण्याची सवय व्हावी, सामाजिक, कौटुंबिक शिष्टाचार त्यानी स्वानुभवानेच आत्मसात करावे, हे या ” सरस्वती सामाजिक विकास केंद्र ” योजनेचे उद्दिष्ट विद्याभारतीने डोळ्यांसमोर ठेवलेले आहे. सप्टेंबरमध्ये, दुसरा टप्पा म्हणजे, निवडक शिक्षक- शिक्षिकांचे, उत्तर व दक्षिण गोव्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षणवर्ग आणि ऑक्टोबरमध्ये,पूर्वतयारीच्या तिसऱ्या टप्प्यात , निवडक विद्यार्थी/ विद्यार्थिनींचे दोन दोन स्वतंत्र जिल्हाशः प्रशिक्षण वर्ग संपन्न केले आहेत.
या योजनेखाली सध्या ७२ शाळा सहभाग घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here