सिंधुदुर्ग – महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल काहीही लागो मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्टीकरण ठाकरे यांचे कोकणातील निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी कणकवली येथे बोलताना आपण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या आमदारांना काय काय सहन करावे लागले हे सर्वांना माहीत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्या येणार आहे. हा निकाल काहीही येऊदेत मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.