सिंधुदुर्ग – सावंतवाडीचे दैवत असलेल्या श्री देव पाटेकरचे देवघर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष बंद राहणार असल्याने श्रावणी सोमवार निमित्त दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी स्क्रीन लावण्यात आली असून भक्तगणांना श्रीदेव पाटेकरांचे दर्शन आता स्क्रीनवर होणार आहे. गर्दी होऊन कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी संस्थानने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भक्तांनी दर्शनासाठी येताना फुले नारळ अगरबत्ती आदी साहित्य आणू नये असे आवाहनही संस्थानतर्फे करण्यात आले आहे.



