सिंधुदुर्ग – बांदा येथील शेर्ले परिसरात आलेल्या पुरात तब्बल आठ ते नऊ फूट मगर आढळली.
तेथील ग्रामस्थांनी पकडून तिला बांदा शहरातील बाजारपेठेत असलेल्या वनविभाग कार्यालयाकडे सुपूर्त केली.
दरम्यान ही मगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
संबंधित मगरीला मनोज बांदेकर,लक्ष्मीकांत बेळगावकर व तुषार मांजरेकर आदींनी जेरबंद केले.
गेले दोन दिवस पाऊस असल्याने शेर्ले बांदा परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.
तेरेखोल आणि कर्ली नदीला पूर आला आहे. तेरेखोल नदीतून ही मगर आली असावी असा वनविभागाचा अंदाज आहे