सिंधुदुर्ग – वेंगुर्ले येथील कार्यक्रमात खासदार विनायक राऊत व आमदार नितेश राणे यांनी एकमेकांवर उधळलेल्या स्तुतीसुमना नंतर खासदार विनायक राऊत हे राजकीय कोंडीत सापडल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी त्या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती.
याच मित्रत्वाच्या स्तुतीसुमनांच्या उधळलेल्या मुद्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एकच गदारोळ झालेला असताना, त्यानंतर सोशल मीडियावर देखील या संदर्भातील विनायक राऊत यांना टार्गेट करणारे काही लेख देखील व्हायरल झाले होते.
त्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी मल्हारी नदीवरील तात्पुरत्या पर्यायी पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार विनायक राऊत यांना या मित्रत्वाच्या स्तुतीसुमनांच्या झालेल्या राजकीय गोंधळाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राणेंना खरमरीत इशाराच दिला आहे.
शिवसेनेशी ज्यांनी बेइमानी केली त्यांना कदापिही शिवसेना माफ करू शकणार नाही. व त्यात नारायण राणे यांचं घराणं नंबर एक वर आहेत असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.