सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील आणखी ११ व्यक्तींचे तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आले. यात शिवसेना नेते कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या पी ए सह अन्य काही बड्या लोकांचा समावेश आहे. दरम्यान आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या तीनशेच्या वर गेली आहे आज अखेर हा आकडा ३०७ इतका झाला आहे तर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५४ इतकी आहे आज ९६ नमुने तपासण्यात आले होते त्याची तक्रार नमुने पॉझिटिव्ह आले आहेत तर ८२ नमुने निगेटिव आहेत तीन नमुने पेंडिंग ठेवण्यात आले आहेत.



