शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या पुत्राची पोलिसांना शिवीगाळ आणि धमकी कणकवली चौकात केला सर्वांसमोरच तमाशा

0
296

 

सिंधुदुर्ग – शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांनी कणकवली मुख्यचौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांन शिवीगाळ करत धमकी दिली. तुझी आता बदली करतो,तू मला ओळखत नाहीस मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे आणि माझी गाडी अडवतोस काय ? तुझी हिम्मतच कशी झाली.तुला माझा इंगा दाखवतोच अशा भाषेत गाडीच्या काचा उघडून पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना व्हिडीओत रेकॉर्ड झाली असल्याने खासदार पुत्राचे प्रताप आता जगजाहीर झाले आहेत.

महामार्ग चौपदरीकरणाच्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पर्यायी मार्गाने गाडी घेऊ जावी अशी विनंती कणकवली पोलीस करत होते.याच दरम्यान मालवण हुन मुंबईकडे जाण्यासाठी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत आणि त्यांचा एक सहकारी कणकवली चौकात आले.पहिल्या बॉरिकेत वर पोलिसांनी त्यांना पुढे रस्ता बंध असल्याने डाव्या बाजूला वळून पर्यायी मार्गाने पुढे जावे असे सांगितले मात्र ते ऐकण्याच्या मनस्तीतीत नसलेल्या गीतेशने गाडी भरधाव उडविली तेव्हा पोलिसांनी दुसऱ्या बॅरिकेट वर अडविले तेव्हा याचा पारा चढला आणि पोलिसांनाच शिवीगाळ करत आता तुला उचलतो मी खासदार राऊत यांचा मुलगा आहे तू ओळखत नाहीस अशी धमकी देत भांडू लागला.भर चौकात हा तमाशा चालू असलेला पाहून काही लोकांनी त्याच्या या भांडणाचा व्हिडीओ केला. आणि सत्यस्थिती उजेडात आली.

एकीकडे संततधार पावसात पोलीस २४तास ट्युटी करत असतांना त्यांनाच धमकवण्याच्या आणि शिवीगाळ करत सोडणार नाही,अशी नाहक धमकी देण्याच्या प्रकारामुळे हा कोण म्हणून बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.गीतेश राऊत आणि त्याचा एक सहकारी असे आपल्या ताब्यातील एम.एच ०२ एफइ 345 ही अलिशान कार घेऊन दुपारी 3 वाजताच्या सुमारास मुंबई कडे जात होते.तेव्हा हा सर्व प्रकार घडला.व्हिडीओत त्याची सर्व कृत्य कैद झाली आहेत.अशा या खासदार पुत्रावर कारवाई करा अशी मागणी समाजातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here