शिक्षकांच्या अडचणी काय आहेत, ते समजून घेण्याकरिता आमदार या नात्याने गेल्या एक वर्षापूर्वी मी शिक्षकांची बैठक बोलावली होती. मात्र त्या बैठकीला काही राजकिय नेत्याने खो घालून सदर बैठक अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी विरोधी पक्षात होतो. मात्र आज सरकारी पक्षात आहे. पून्हा शिक्षकांच्या समस्या समजून घेण्याकरीता लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल. या बैठकीला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी आशा काणकोणचे आमदार व उपसभापती इजिदोर फर्नाडीस यानी व्यक्य केली. चानडी येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भागशिक्षणाधिकारी कार्यालयाचे नूतनिकरण करण्यात आल्याने या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा नितू देसाई, उपनगराध्यक्ष किशोर शेट, नगरसेवक छाया कोमरपंत, प्रार्थना नाईक गावकर, दिवाकर पागी, हेमंत नाईक गावकर, श्याम देसाई, आगोंदचे सरपंच आबेल बोर्जिस, साहाय्यक उपसंचालक डॉ. उदय गावकर, भागशिक्षणाधिकारी गणेश शेट उपस्थित होते.
काणकोणच्या आवल या भागशिक्षणाधिकारी कार्यालयाचे नूतनिकरण करताना माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे आपल्याला मोलाचे सहकार्य मिळाले, असे उपसभापती इजिदोर फर्नाडीस यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, महादेव देसाई, माजी सरपंच, तालुक्यातील विविध माध्यमिक शाळाचे मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक विध्यालयाचे प्राचार्य, सरकारी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. उदय गावकर यांनी सरकारी शाळा आदर्श बनविण्यासाठी शिक्षकाबरोबरच पालकांचाही सहभाग उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा देसाई, नगरसेविका कोमरपंत यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पैंगिणकर यांनी केले. काणकोणच्या सर्व शिक्षा अभियानचे प्रमुख नवनाथ सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यानी स्वागत गीत सादर केल्यानंतर अश्विनी भगत, तनुजा रायकर, पदमा देसाई, मोहिनी प्रभुगावकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. भागशिक्षणाधिकारी शेट यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या पूर्वी उपसभापती फर्नाडीस यांनी सदर इमारतीच्या समोर असलेल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.
काणकोणचे आमदार इजिदोर फर्नाडीस यांची उपसभापती पदी निवड झाली. त्यानंतर प्रथमच शनिवारी सकाळी ते काणकोण करमलघाट येथील श्री शक्ती गणपती मंदिराजवळ पोहोचताच आंगोदचे माजी सरपंच प्रमोद फळदेसाई, श्रीस्थळ पंचायतीचे माजी पंच संजू नाईक, शुभम कोमरपंत, धीरज नाईक गावकर, अशोक पागी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कार्यालयात कार्यकर्त्यानी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर उपसभापतींनी खालवडे येथील सरस्वती प्राथमिक शाळेच्या धान्य रोपणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला, यावेळी त्यांनी प्राथमिक शाळेच्या विध्यार्थाना शेतीचे महत्व सांगितले. यावेळी दिलखुश शेट, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष दामोदर च्यारी, सभासद विशाल देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप केंकरे, श्याम देसाई, विनय तुबकी, कृषी अधिकारी शिवराम नाईक गावकर, सम्राट भगत व इतर उपस्थित होते.
काणकोणचे आमदार तथा गोवा विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नाडीस यांच्या हस्ते काणकोणच्या विविध पंचायतीत फळ झाडांचे वाटप करण्यात आले. आगोंद येथे सरपंच आबेल बॉर्जीस, पंच प्रमोद फळदेसाई, टिपु पागी व अन्य उपस्थित होते.
पैंगीण पंचायतीत सरपंच जगधीश गावकर, रामदास पुजारी, आयडा फर्नाडीस, प्रवीर भंडारी, शेतकी अधिकारी शिवराम नाईक गावकर व इतर उपस्थित होते.



