वैभवावाडी पंचायत समितीवर भाजपचे ‘कमळ’ फुलले; नितेश राणेंकडून विजयी उमेदवारांचे कौतुक

0
4

वैभवावाडी: वैभवावाडी तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्भेळ यश संपादन करत आपला गड राखला आहे. सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत भाजपाने या पंचायत समितीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या दणदणीत विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी वैभवावाडीत येऊन सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले.

या निवडणुकीत कोळपे-भुईबावडा मतदारसंघातून देवानंद पालांडे आणि कोळपे येथून सुवर्णा संसारे यांनी विजय मिळवला. कोकिसरे-उंबर्डे मतदारसंघात साची कोलते यांनी, तर कोकिसरे येथून साधना नकाशे यांनी बाजी मारली. तसेच लोरे-खांबाळे मतदारसंघातून मंगेश लोके आणि लोरे येथून सिद्धेश रावराणे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत भाजपचा विजय निश्चित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here