वैभववाडीत एनडीआरएफची टीम दाखल, पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ व भुईबावडा घाटात कोसळलेली दरड हटवली

0
260

 

सिंधुदुर्ग – संततधार पडणाऱ्या पावसामुळे घाट मार्गात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटात आज सकाळी दरड कोसळली. तर दुपारी भुईबावडा घाटात दरड कोसळली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घाट मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेल्या एनडीआरएफच्या टीमने व सार्वजनिक बांधकाम विभागाने भुईबावडा घाटातील दरड बाजूला केली आहे. त्यामुळे वाहतूक तात्काळ पूर्ववत झाली आहे.

अतिवृष्टीच्या इशा-यानंतर जिल्ह्यात एनडीआरएफ च्या दोन टीम दाखल झाल्या आहेत. या टीम जिल्ह्यातील विविध भागाची पाहणी करत आहेत. रविवारी दुपारी वैभववाडी तालुक्यात एक टीम दाखल झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे करूळ आणि भुईबावडा घाटात दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हे दोन्ही घाटमार्ग कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here