वेंगुर्ले तालुक्यातील वांयगणी सरपंचांविरोधात ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार

0
194

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील वेंगुर्ला वांयगणी कामतवाडी येथील सार्वजनिक विहीरीच्या बोगस कामाची तक्रार येथील ग्रामस्थानी केली होती. या विहिरींची पाहणी करायला शासनाचे अधिकारी आले होते. यावेळी विहिरीच्या कामावरून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यातून बाचाबाची झाली. कुणीतरी गावचे सरपंच सुमन कामत यांना आपण मास्क का लावला नाही अस विचाराल. यावेळी मास्क लावत नाही काही ते करून घ्या अशी भाषा सरपंच यांनी वापरली. याबाबतचा व्हीडीवो व्हायरल झाला असून ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे सरपंचांच्या वागण्याची तक्रार केली आहे.

वांयगणी कामतवाडी येथील सार्वजनिक विहीरीच्या कामाची पाहणी करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आले होते. त्यांच्या समवेत वांयगणी सरपंच सुमन कामत व उपसरपंच ही आले होते. मात्र सरपंच व उपसरपंचाच्या तोंडाला मास्क नसल्याने ग्रामस्थानी विचारना केली असता येथील सरपंचानी ग्रामस्थाना उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आम्ही कोणीही मास्क घालणार नाही. काय करायचे ते करून घ्या अशी उर्मट भाषा सरपंचानी वापरली.असे ग्रामस्थांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सध्या कोरोनाच्या काळात सरपंचांवर मोठी जबाबदारी आहे. ग्राम सनियंत्रण समितीचे सरपंच हे अध्यक्ष आहेत. कोरोना सारख्या महामारीच्या आजारात गावची जबाबदारी असणाऱ्या गावचे प्रथमनागरीक असणाऱ्या सरपंचानीच सरकारने घालून दिलेल्या नियमांचेच उल्लंघन केले आहे. मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरल्यामुळे सरपंच, उपसरपंचावर कारवाई करावी असे ग्रामस्थांनी आपल्या वेंगुर्ला तहसीलदार यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून केली आहे.

यावेळी बोलताना ग्रामस्थ लाडू कामात म्हणाले, आमच्या शासकीय विहिरीचे काम अर्धवट झालेले आहे. हे काम पाहण्यासाठी शासकीय अधिकारी आले होते. यावेळी या अधिकाऱ्यांना आम्ही कामाबत विचाराल असता त्यांच्या अर्धवट कामाबत लक्षात आले. काही कारण सांगून ते काढता पाय घ्यायला लागले तेव्हा सरपंचाना ग्रामस्थांनी मास्क बद्दल विचाराल असता त्यांनी उद्धट उत्तर दिल. सरपंच सारख्या व्यक्तीकडून अस अपेक्षित नाही असेही लाडू कामात यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here