विनायक राऊत यांच्या मुलावर गुन्हा दाखल करा, भाजपने कणकवली पोलिसांना दिले निवेदन

0
230

 

सिंधुदुर्ग – खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने पोलिसाला केलेल्या दमदाटी प्रकरणी सिंधुदुर्गात राजकारण तापले आहे. आज कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी याचू भेट घेत भाजापाने खासदार पुत्र गीतेश राऊत याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भाजपाच्या वतीने आज पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. वाहतून पोलीस विश्वजित परब यांच्यावर पालकमंत्री आणि विनायक राऊत यांच्याकडून दबाव आणण्याचा प्रकार सुरू आहे. तो थांबवा. अशी मागणी या निवेदनातून करण्यात अली आहे. जर गीतेश राऊत याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हयात उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही भाजपने दिला आहे. यावेळी कणकवली भजापा अध्यक्ष संतोष कानडे, जिप सभापती बाळा जठार,माजी जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे,भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत,पंस सदस्य मिलिंद मेस्त्री,युवक जिल्हासेक्रेटरी संदीप मेस्त्री, आदी उपस्थित होते.

या प्रकरणी कोणतीही तक्रार देऊ नये असा दबाव वाहतूक पोलीस कर्मचारी विश्वजित परब यांच्यावर आणला जातोय असा आरोप यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कांदे यांनी केला.

तर परब हे एक कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत. मात्र त्यांची मानसिक स्थिती आता चांगली नाही असे कारण पुढे करून त्यांना तक्रार देण्यापासून रोखले जात आहे. असा आरोप भाजप माजी महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here