सिंधुदुर्ग – वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर वनपाल अनिल जाधव वनरक्षक शेगावे वनरक्षक सुतार वनरक्षक मणेर वनरक्षक अनिल राख यांनी अवैध लाकूड जप्त केले आहे.
फोंडा दाजीपूर रस्त्यावर आकेशीय जातीचे अवैध लाकूड वाहतूक करत असताना फोंडा येथे ट्रक व लाकूड असा तब्बल 7 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी प्रशांत नामदेव राणे रा.भैरिबांबर ता राधानगरी व अमर बळवंत शिंदे रा.ठिपकुर्ली ता राधानगरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रक क्र. MH 10 – z-0631मधून आकेशीय लाकडाची विनापरवाना वाहतूक होत होती.
यावेळी लाकडासह ट्रक वनविभागाच्या फोंडाघाट येथील विक्री आगारात आणण्यात आला. यावेळी 7 लाख रुपये किंमतीचा टेम्पो व 65000 हजार रुपये किमतीचे लाकूड जप्त करण्यात आले.