कणकवली – तालुक्यातील शिरवल ग्रामस्थांनी सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र शिरवल गावात सुरु करुन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून आपले करीअर घडवावे असे आवाहन युनिक अँकॅडमी शाखा कणकवलीचे शाखा व्यवस्थापक सचिन कोर्लेकर यांनी केले आहे. शिरवल टेंबवाडी मधील .विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि करीअरच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेसची गरज आहे. आपल्या गावातील होतकरु गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन मिळावे म्हणून शिरवल ग्रामस्थांनी सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र शिरवल गावात सुरु करुन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असेही सचिन कोर्लेकर त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा वारकरी संप्रदाय समितीचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गंवडळकर, नाट्य अभिनेते महेश सावंत, पोलिस पाटील विजय शिरवलकर,सुनील कुडतरकर.सुर्यकांत सावंत, बाळकृष्ण कुडतरकर,तुळशीदास कुडतरकर, ओमकार सावंत आदी उपस्थित होते.