सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील वेंगुर्ले- आरवली येथील चित्रकार रविराज चिपकर याने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रवीराज याने एकनाथ शिंदे याचं वाळुशिल्प साकारून शुभेच्छा दिल्या आहेत.
वाळु आणि रांगोळीच्या सहाय्याने त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाळुशिल्प साकारले आहे.
रविराज यांनी साकारलेल्या चित्राची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.
ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर रविराज याने त्यांचे वाळू शिल्प साकारले.