लॉकडाऊन असताना कणकवलीत दुकाने सुरू, कारवाई सुरू होताच व्यापाऱ्यांची उडाली धावपळ पोलिस व नगरपंचायतची संयुक्त दंडात्मक कारवाई

0
212

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात 8 जुलै पर्यंत लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू असल्याने कणकवलीत आज पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. यात 8 व्यापार्‍यांकडून दंड वसूल करण्यात आला. पटवर्धन चौकातून ही कारवाई सुरू होताच बाजारपेठेतील विक्रेते आणि व्यापार्‍यांची मोठी धावपळ उडाली होती.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी 2 ते 8 जुलै कालावधीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तरीही कणकवली बाजारपेठेत काही हॉटेल, कपडे व इतर प्रकारची दुकाने खुली होती. त्यामुळे आज कणकवलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले तसेच नगरपंचायतीचे अधिकारी सतीश कांबळे यांच्या पोलिस आणि नगरपंचायत कर्मचार्‍यांनी बाजारपेठेत कारवाई सुरू केली. यात अत्यावश्यक सेवा वगळता सुरू असलेल्या अन्य दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाची कारवाई सुरू होताच, बाजारपेठेत आलेले विक्रेते तसेच व्यापारी यांची मोठी धावपळ सुरू झाली. काही क्षणात उघडी असलेल्या या दुकानांची शटर्स तातडीने बंद करण्यात आली. तर बाजारपेठेत आलेले विक्रेतेही आपले दुकान आवरून पसार झाले. दरम्यान 8 व्यापारी आणि विक्रेत्यांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here