सिंधुदुर्ग – रायगड ही महाराजांच्या राज्याची राजधानी होती. तशीच सिंधुदुर्ग किल्ला ही महाराजांची पाण्यातील राजधानी होती. त्यामुळे रायगडाबरोबरच सिंधुदुर्ग किल्याचिही दुरुस्ती, डेव्हलपमेंट व्हावी. यासाठी पावसाळ्याच्या कालावधीत एक परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा. म्हणजे त्याप्रमाणे कार्यवाही करता येईल. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याचे खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
खा संभाजीराजे छत्रपती सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ह्यावर पडझड़ झाली होती. याची पाहणी करण्यासाठी ते आले होते. मात्र समुद्र खवळलेला असल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता आले नाही. त्यामुळे श्री शिवराजेश्वराचे दुरूनच दर्शन घेतले. यानंतर त्यांनी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा संभाजीराजे म्हणालेकी, गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळामूळे सिधूंदुर्ग किल्ल्यावरील श्री. शिवराजेश्वर मंदिराचे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन, परिस्थिती चा आढावा घेतला. रायगड प्राधिकरणाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याची देखभाल दुरुस्ती तसेच डेवलपमेंट कसे करता येईल त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे जिल्हाधिकारीयांच्याशी झालेल्या चर्चेत निश्चित झाले आहे.
रायगड प्राधिकरण झाले. त्यात सिंधुदुर्ग किल्ला खास बाब म्हणून घेतला आहे. कारण रायगड ही महाराजांची राजधानी होती. मात्र सिंधुदुर्ग किल्ला ही त्यांची पाण्यातील राजधानी होती. त्याचप्रमाणे या किल्ल्याला फार महत्त्व आहे. या ठिकाणी इको फोर्टचा कन्सेप्ट राबविण्याचा विचार आहे. या किल्ल्यावर काही लोक ही राहतात त्यांनाही या माध्यमातून रोजीरोटी मिळावि असा विचार आहे.
या किल्लाला फार महत्त्व आहे. या किल्ल्यावर एकमेव छत्रपती शिवाजी राजांचे मंदिर आहे. हे मंदिर महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज यांनी बांधले आहे. त्याचप्रमाणे याठीकाणी सभामंडप आहे. तो महाराजांचे ९ वे वंशज छत्रपती शाहू महाराजांनी बांधला आहे. या किल्ल्यावर महाराजांच्या हाताचा ठसा आहे. हा किल्ला स्वतः महाराजांनी बांधून घेतला आहे. अशा महत्त्वाच्या अनेक बाबी या ठिकाणी आहेत. हे सर्व महत्त्व आपण जगाला कसं पटवून सांगू शकतो आणि जास्तीत जास्त पर्यटक या कील्ह्यावर कसे येतील यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी रायगड किल्ल्या प्रमाणे जर सिंधुदुर्ग किल्ल्याचे जतन व संवर्धन करत आले, तर त्या सारकहि दुसरी गोष्ट नाही. त्यासाठी पावसाळ्याच्या कालावधीत एक प्रपोजल तयार केले तर त्यावर कारवाई करता येईल यासाठी तसा प्रस्ताव तयार करावा असे जिल्हाधिकारी यांना आपण सांगितले.त्याचप्रमाणे किल्ल्यावर झालेली पडझड यावर लक्ष देऊन त्याची तात्काळ दुरुस्ती करा असेही सांगितले असे खा संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



