गतिमंदी मुलीवर सात जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार करुन तीला गरोदर केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे घडली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सातही जणांना पोलिसांनी अटक केली असून अलिबाग न्यायालयाने त्यांना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गावात पीडित मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहते. ही मुलगी थोडीशी गतीमंद आहे. तीच्या परिसरात राहणाऱ्या सात जणांनी या मुलीच्या गैरफायदा घेऊन सात महिने वारंवार आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीची तब्येत बिघडून त्रास जाणवू लागला. यासाठी पीडित मुलीच्या घरच्यांनी तीला डॉक्टरकडे नेले.
डॉक्टरांनी तपासले असता, पीडित मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून यामध्ये परिसरातील सात जणांनी पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. रेवदंडा पोलीसांनी सात जणांना त्वरित अटक केली. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, 8 एप्रिल पर्यंत न्यायालनाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास डीवायएसपी सोनाली कदम करीत आहेत