रस्त्यांवरील वर्दळ रोखण्यासाठी मंत्री उदय सामंत उतरले रस्त्यावर

0
224

 

लॉकडाऊनच्या दहाव्या दिवशी रत्नागिरीतल्या रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ वाढलेली पहायला मिळत होती. ही वर्दळ रोखण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत थेट रस्त्यावर उतरले. लॉकडाऊनच्या काळात अनावश्यक बाहेर पडणाऱ्यां लोकांना समजवण्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते.

रत्नागिरीतल्या माळनाका परिसरातल्या पोलीस चेक पोस्टवर त्यांनी स्वतः गाड्या थांबवत लोक नेमके कोणत्या कारणांसाठी बाहेर पडत होती, याची पाहणी केली. तसेच अनावश्यक फिरणाऱी वाहने सापडतात का? याची सुद्धा उदय सामंत यांनी पाहणी केली. अनावश्यक फिरणाऱ्या गाड्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.

अत्यावश्यक सेवेसाठी ई-पास घेतलेलीच मंडळी रस्त्यावर पहायला मिळाली. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनावश्यक फिरणाऱ्या सर्वांवर कडक करावाई करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या गाड्यांमधून बाहेरची माणसं कोणी घेऊन येऊ नयेत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here