रत्नागिरी जिह्यात होम क्वारंटाईनची संख्या वाढतीच! 

0
296

 

रत्नागिरी जिह्यात होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या 735 वर पोहोचली आहे. संस्थात्मक आयसोलेशनच्या संख्येत वाढ झालेली नाही, असे जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. शनिवारी असलेल्या होम क्वारंटाईन संख्येत 10 ने वाढ झाली आहे.

रत्नागिरी जिह्यात शहरी क्षेत्रात चारचाकी वाहनांच्यासोबत दुचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे. जिह्यात जेएसडब्ल्यू, जयगड पोर्ट तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱया कंपन्यांनी त्यांच्याकडे रोजंदारीवर असणाऱया कामगारांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था केली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

इतर रोजंदारीवर असणाऱया कामगारांची सर्व तालुक्यातील संख्या 474 एवढी आहे. यापैकी राहण्याची व भोजनाची व्यवस्था नसलेल्यांची संख्या 21 आहे. खेड येथे निवारा केंद्रात 12 व दापोली येथे 9 जणांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या जेवणाची व औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या रुग्ण संख्येत वाढ नाही. यापूर्वी तपासणीला पाठवण्यात आलेल्या आणखी 6 जणांना कोरोना संक्रमण नसल्याचे प्राप्त अहवालावरुन दिसून आले आहे.

जिह्याच्या अंतर्गत वाहन परवान्यासाठी ई-पासची व्यवस्था करण्यात आली आहे. जिह्यात होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या 735 पर्यंत वाढली आहे. शनिवारी संध्याकाळी ही संख्या 725 एवढी होती. होम क्वारंटाईन म्हणून हातावर शिक्का मारलेल्या व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे कोणालाही आढळून आल्यास जिल्हाधिकाऱयांच्या नियंत्रण कक्षाला कळवावे. अशा व्यक्तींना सक्तीने होम क्वारंटाईन बनवण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here