रत्नागिरी जिल्हय़ात दुहेरी संकट, कोरोनानंतर आता स्वाईन फ्लू

0
200

 

भोस्ते-जलालशहा मोहल्ल्यातील 7 जणांना कोरोना संशयित म्हणून कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले होते. या सातहीजणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असला तरी यातील 5 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोरोनापाठोपाठ आता स्वाईन फ्लूनेही जिल्हय़ात एन्ट्री केल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

सौदी अरेबियातून परतलेल्या भोस्ते-जलालशहा येथील एका व्यक्तीस सर्दी, ताप, खोकला आदी कोरोना सदृश लक्षणे आढळल्याने शनिवारी रात्री विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याच्याच कुटुंबातील अडीच वर्षीय चिमुरडय़ासह 6 जणांनाही उपजिल्हा रूग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले होते. सातहीजणांच्या स्वाबचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी भोस्ते परिसरातील नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. गावात जाणारे मार्ग बंद करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या सातहीजणांचा अहवाल रविवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झाला. त्यानुसार सर्वजण कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, यातील पाच जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

दुहेरी संकट

कोरोनाच्या संकटाशी जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणेसह सर्व प्रशासनच दोन हात करत असतानाच आता स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळल्याने यंत्रणेसमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे. स्वाईन फ्लू हा देखील संसर्गजन्य रोग असल्याने तो रोखण्यासाठीही पावले उचललावी लागणार आहेत. त्यामुळे यंत्रणांबरोबर नागरिकांचीही जबाबदारीही वाढणार आहेत. काही वर्षांपुर्वी याच स्वाईन फ्लूने देशात हाहाकार उडवला होता.

भोस्तेसह खेड परिसरातील नागरिकांनो काळजी घ्या : अविशकुमार सोनोने

भोस्ते येथे स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांसह खेड परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी. इतरांशी बोलताना सुरक्षित अंतर राखावे. अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये. नियमित साबणाने हात स्वच्छ धुवावेत. सर्दी, खोकला, ताप असल्यास स्थानिक आरोग्यसेवक, आशासेविका, शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी केले आहे.

258 होम क्वारंटाईन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य यंत्रणा सर्वच पातळीवर कसोशीचा प्रयत्न करत आहे. परदेशातून तालुक्यात परतणाऱया नागरिकांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. माहिती मिळताच आरोग्य पथकातील कर्मचारी तातडीने त्यांची प्राथमिक तपासणी करत आहेत. परदेशातून परतलेल्यांसह पुणे, मुंबई व अन्य ठिकाणाहून येथे आलेल्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. होम क्वारंटाईनची संख्या 258वर पोहचली आहे. यातील दोघेजण आयसोलेशनमध्ये असून त्यांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here