रत्नागिरी शहरानजीक आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती दिल्ली येथून आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली. त्यामुळे आता आरोग्य विभाग चांगलेच अलर्ट झाले आहे. हा कोरोना बाधित रुग्ण दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथील धार्मिक कार्यक्रमास गेला होता.
यापूर्वी रत्नागिरीत गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावातील एक रुग्ण सापडला होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर आतापर्यंत त्याच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला असताना आता दिल्लीतून आलेला हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.