रत्नागिरीत शासकीय डॉकटर कोरोना पोझोटीव्ह

0
258

 

रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील भूलतज्ञ व बालरोगतज्ञनही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दोन प्रमुख वैद्यकीय अधिकाऱयांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर सिव्हीलच्या आणखी दोन स्टाफ नर्सना कोरानाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली.

भूलतज्ञांचा व त्यापाठोपाठ बालरोगतज्ञाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. या बालरोग तज्ञांनी अनेक बालकांना कोरोनातून बाहेर काढण्यात महत्वाची भुमिका बजावली असून ते गुरूवारी शासकीय रूग्णालयाच्या सेवेतून मुक्त झाले होते. मात्र, त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या डॉक्टरांसोबतच्या त्यांच्या पत्नी व मुलगीलाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान गुहागर तालुक्यातील अंजनवेलचे पोस्टमनचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here