रत्नागिरीत पावसाचा दणका, रायगडमध्ये पुराचा धोका

0
332

सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल़े चिपळूण, खेड, राजापूर येथील काही रहिवासी भागात पाणी शिरले आह़े तर नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. काजळी व जगबुडी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आह़े पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल़ा खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून एनडीआरफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आह़े एनडीआरफचे 20 जवान व श्वान पथक चिपळूण शहरात दाखल झाले आहे.

रायगडमधील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रायगड जिल्ह्यात 25 जवानांसह एनडीआरएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, सुदैवाने पाऊस थोडा कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही खाजगी बचाव पथके सुद्धा तैनात करण्यात आली आहेत

चिपळुणात मुंबई -गोवा महामार्गाला नदीचे स्वरुप

चिपळूणात मंगळवारी दिवसभर शहरासह तालुकाभर कोसळलेल्या धुवाँधार पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. शहरातील डीबीजे महाविद्यालयाजवळील पर्यायी मार्गावर तीन फुटापर्यत पाणी साठल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते. कापसाळ येथेही पाणी साठल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. शहरातही लोटिस्मा, आईस फॅक्टरीसह ठिकठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने मुसळधार पावसात नागरिकांची दैना उडाली.

खेडमध्ये जगबुडी, नारंगीने धोक्याची पातळी ओलांडली

खेड तालुक्याला पावसाने झोडपून काढले. संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जगबुडी व नारंगी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने नगर प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला. शहरातील मटण व मच्छीमार्केट परिसरातही पुराचे पाणी घुसले आहे.

संगमेश्वरात नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

सलग दोन दिवस पडणाऱया मुसळधार पावसाने संगमेश्वर मधील बाव नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. पावसाची संततदार सुरू असून तालुक्यातील संगमेश्वर, फुणगूस, कसबा, माखजन बाजारपेठ मध्ये कधीही पाणी घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

राजापुरात दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील चिंचबांध रस्त्यावर अर्जुनाच्या पुराचे पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाचल परिसरालाही पुराचा तडाखा सहन करावा लागला.

रायगडमध्ये पूरपरिस्थितीचा धोका

रायगडमधील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. अर्थात, ही पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. महाडमध्ये 9, पोलादपूरमध्ये 13, माणगावमध्ये 1 अशी 23 गावांमधील सुमारे 1535 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने सावित्री नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. रायगड जिल्ह्यात 25 जवानांसह एनडीआरएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, सुदैवाने पाऊस थोडा कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही खाजगी बचाव पथके सुद्धा तैनात करण्यात आली आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here