रत्नागिरीत कोरोना रूग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरालाच लक्षणे? डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

0
250

 

रत्नागिरी जिल्हय़ात आढलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार करणाऱ्या  महिला वैद्यकीय अधिकारीच कोरोना संशयित असल्याने खळबळ उडाली आहे.  संबधीत डॉक्टरना आरोग्य विभागाकडून एमआयडीसी गेस्टहाऊसमध्ये ‘कोरोंटाईन’ करण्यात आले आहे. त्यातच प्रशासनाने सुरक्षीतता न पुरवल्याचा व आपला स्वाब तपासणीसाठीही न पाठवल्याचा आरोप संबधीत महिला डॉक्टरने निवेदनाद्वारे केला आहे तर दुसरीकडे लक्षणे आढळल्यानंतरही स्वतःल कॉरोन्टाईन न केल्याने संबधीत डॉक्टरविरोधात डॉ. बोल्डे यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील वादही चव्हाटयावर आला आहे.

संबधीत महिला डॉक्टरने दुबईतून आलेल्या संशयिताची तपासणी केली होती. या रूग्णाचा अहवाला पॉझीटीव्ह आला होता. रूग्ण तपासणीदरम्यान आपल्या कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आली नसल्याचा आरोप या डॉक्टरने केला आहे. तसेच उपचार आपल्यालाही कोरोनासदृश्य लक्षणे दिसू लागल्याने आपला स्वाब तपासणीसाठी दिला. मात्र डॉ. बोल्डे यांनी तो तपासणीसाठी पाठवला नाही, त्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे निवेदन या महिला डॉक्टरने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकाना दिले आहे. या पार्श्वभुमीवर संबधीत महिला डॉक्टरला एमआयडीसी गेस्ट हाऊमध्ये कॉरोन्टाईन करण्यात आले आहे.

सिव्हील जबाबदार नाही

कोरोना संशयित रूग्णांना हाताळताना पूर्ण खबरदारी घेवून काळजीपूर्वक तपासणे प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱयांचे काम आहे. यासाठी सूचना करण्याचीही आवश्यकता नसते. जगभरात हा विषय इतका गंभीर असतानाही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान हलगर्जीपणा केला आहे, त्याला सिव्हील प्रशासन जबाबदार नाही. त्यांचे सँपल पुण्याला पाठविण्यात आले असून त्यांना एमआयडीसी गेस्टहाऊस येथे ‘कोरोंटाईन’मध्ये ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी म्हटले आहे.

डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

कोरोनाग्रस्त रूग्णावर उपचार करणाऱया डॉक्टरने स्वतःला विलगीकरण (कारोनटाईन) न करून इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरूद्ध जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी शहर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

कारोनाची लक्षणे असताना या डॉक्टर बेजबाबदारपणे कोणतीही सुरक्षा साधने न वापरताना रूग्णालय आवारात फिरत होत्या. त्याचे हे कृत्य मानवी जीवीतास धोका निर्माण करणारे असल्याचा आरोप ठेवत डॉ. बोल्डे यांच्या तक्रारीनुसार भादवि कलम 369, 270, 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

इतरांचे आरोग्य धोक्यात का?

वैद्यकीय अधिकारी नेहमी रूग्णांना काळजी घ्या असे सांगत असतात. मात्र संबधीत डॉक्टरनी खबरदारी न घेता रूग्ण कसे तपासले. कोरोना संशयित असतानाही संबंधित डॉक्टर निवेदन देण्यासाठी सगळीकडे कशा फिरत होत्या. संशय आल्या आल्याच त्यांनी स्वत:ला कोरोंटाईन करणे गरजेचे होते. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास त्या ज्यांच्या संपर्कात आल्या त्या सर्वाना कोरोन्टाईन करावे लागेल. अन्य मार्गानेही तक्रार करता आली असती, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here