रत्नागिरीतील पानवल डोंगर खचला, धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम 

0
211

एमआयडीच्या हरचिरी धरणातील पाणी पुरवठाहि बंद 

कोंकण –   रत्नागिरीतील पानवल डोंगर खचला आहे. धरणाशेजारी असलेल्या डोंगराचे मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झाले आहे. या भुस्खलनात रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणातुन रत्नागिरीकडे येणारी पाईपलाईन आणि रस्ता उध्वस्त झाला आहे. पाईपलाईन गाडली गेल्याने पानवल धरणातुन शहराला होणारा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे निम्म्या शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. पानवल धरणातुन ग्रॅव्हीटीद्वारे शहराला पाणी पुरवठा होतो. परंतु, पानवल धरणातुन शहराकडे येणारी पाईपलाईनच या भुस्खलनात मातीखाली गेली आहे. तब्बल ३० फुट पाईपलाईन मातीखाली गेल्याने मंगळवारी रत्नागिरी शहराला पानवल धरणातुन होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. पानवल धरणातुन पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शीळ धरणातुन तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. मातीखाली गेलेली पाईपलाईन पुन्हा बाहेर काढणे शक्य नसल्याने या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम नगर परिषदेकडून हाती घेण्यात आले आहे. एमआयडीच्या हरचिरी धरणातील पाणी पुरवठा मागील दोन दिवसांपासून ठप्प आहे. मुसळधार पावसाने काजळी नदीला पूर आला आहे. यामुळे हरचिरी धरणातील पाण्याची पातळी वाढली असून धरणातील पंप पूर्णत: पाण्याखाली गेले आहेत. यामुळे धरणातुन पाणी उपसा करणे शक्य नसल्याने एमआयडीसीचा पाणी पुरवठा देखील ठप्प आहे.

(सौजन्य : www.sahajshikshan.com )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here