रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश

0
2

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव असलेले आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत*.

सभागृहात प्रदूषणविषयक मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संबंधित प्रकरणावर ब्रीफिंगसाठी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देवेंद्र सिंग यांना बोलावले होते. मात्र, ते ब्रीफिंगसाठी उपस्थित न राहिल्याने हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

या प्रकाराची गंभीर दखल घेत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला. प्रशासकीय शिस्त व जबाबदारीचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्षांनी तत्काळ कारवाई करत आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
या निर्णयामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, शासकीय बैठका व सभागृहातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट संदेश या निलंबनातून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here