मोरे येथील स्वप्ननगरीला खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी दिली भेट कोविड रुग्णांची तपासणी व औषध उपचाराचा घेतला आढावा स्वप्ननगरीत सीसीसी सेंटर केले जाहीर

0
203

 

सिंधुदुर्ग – कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथील स्वप्ननगरी या अपंग पुनर्वसन व मदत केंद्रातील तब्बल २२ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.याची गंभीर दखल खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी घेत मोरे गावात आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. माणगाव प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांच्याकडून रुग्णांची तपासणी व औषध उपचाराचा आढावा घेण्यात आला.
कोविड रुग्णांवर उपचारासाठी स्वप्ननगरीलाच सीसीसी सेंटर म्हणून जाहीर करण्यात आले. डॉ. उमेश पाटील यांना रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी बाबत सूचना देण्यात आल्या तसेच रुग्णांच्या सेवेसाठी ६ नर्सची नेमणूक करण्यात आली आहे.येथील रुग्ण व इतरांच्या जेवणाची व्यवस्था बचत गटामार्फत करण्यात आली. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, मास्क, सॅनिटायझर,पीपीई किट तसेच आवश्यक साहित्य याठिकाणी मागविण्यात आले आहे.
यावेळी जि.प.गटनेते नागेंद्र परब, जी.प.सदस्य राजू कविटकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभाग प्रमुख रामा धुरी, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here