सिंधुदुर्ग – चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी कोरोनाची मोफत तपासणी करून आणा ही आमदार नितेश राणे यांनीं मांडलेली भूमिका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाही पटलेली आहे.भजापा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारने चाकरमान्यांना कोरोना रिपोर्ट काढून गावी पाठवावे जेणे करून नंतर उदभवणारा क्वारंटाइनचा प्रश्न सुद्धा सुटेल व सुरळीत आणि आनंदात गणेशोत्सव साजरा होईल असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकारला सूचित केले आहे.
ठाणे-मुंबईतून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या प्रत्येकाची मुंबईत करोना चाचणी करावी. ही चाचणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा कोकणात गेल्यानंतर क्वारंटाइन राहण्याची आवश्यकता भासणार नाही.यापद्धतीने सरकारने नियोजन करावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चांद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.भाजपा आम.नितेश राणे यांनची पहिल्या पासून हीच मागणी आहेआणि ती योग्य असल्याचे सर्वांनीच मान्य केले आहे.



