मालवणात पडलेली झाडे तोडण्यासाठी आ.वैभव नाईक यांनी पाठवली टीम अनेक घरांवर पडलेली झाडे तोडून नागरिकांना केले मदतकार्य

0
283

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन नुकसान झाले. नागरिकांच्या घरावर झाडे पडली होती. झाडे पडल्याने रस्ते वाहतुकीस बंद होते. यामुळे नागरिकांची रहदारी बंद झाली होती. नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी गेले दोन दिवस असगणी येथील सचिन जंगले यांची एक टीम झाडे तोडण्यासाठी मालवणात पाठवली होती.

मालवण शहर, देवबाग, तारकर्ली, दांडी या भागात रस्त्यावर पडलेली झाडे, घरावर पडलेली झाडे या टीमने तोडून बाजूला करत नागरिकांना संकट काळात मदतकार्य केले. आमदार वैभव नाईक यांनी देखील या भागात भेट देऊन पाहणी केली. सलग दोन दिवस हे मदतकार्य सुरु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here