माथेरानमध्ये जमिनीची धूप, झाडेही कोसळताहेत 

0
224

प्रतिनिधी / रायगड

गेले दोन दिवस पडलेल्या पावसाने माथेरानकरांच्या मनात धडकी भारावली आहे. येथे झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. गेल्या २४ तासात माथेरानला ४४० मिलिमीटर पावसाची देशामध्ये सर्वाधिक नोंद झाल्याचा दावा स्कायमेट या संस्थेने केला आहे. ५ ऑगस्ट पर्यंत ४ हजार ६७३  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. माथेरानला अतिवृष्टी मुळे जमिनीची धुप झाल्याने माथेरान मध्ये अनेक ठिकाणी मुळासकट मोठमोठे वृक्ष उन्मळुन पडत आहेत. मंगळवार दिनांक ६ ऑगष्ट रोजी पहाटेच्या सुमारास ८ ते १० ठिकाणी मोठमोठी झाडे मुळासकट उन्मळुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

माथेरानचा मेरीटाईम हॉऊस रोड, माधवजी गार्डन, नगरपरीषद दवाखाना तसेच येथील एम.जी.रोड वरील शैलेश स्टोअर्स तसेच सलीम शेख यांच्या दुकानावर झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. भास्कर घाग यांच्या दुकानावर भलीमोठी जांभळीची दोन झाडे पडल्याने दुकान जमीनदोस्त झाले आहे त्याच्याच चार पाच दुकाने सोडून सलीम शेख यांच्या दुकानावर दुपारी १ च्या दरम्यान जांभळीचेच झाड पडल्याने दुकानाची खूप मोठी हानी झाली आहे. तर वाल्मिक नगर येथील पडलेल्या झाडामुळे अशोक वाघेला या रहिवाशाचे  घर थोडक्यात बचावले असले तरी शेजारी राहत असलेल्या जिजा देसाई या मोलमजुरी करणाऱ्या विधवा महीलेच्या घराचे फाउंडेशन झाडाच्या मुळ्यांनी उखडल्याने घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली त्यामुळे या बेसहारा महीलेचा निवारा हीरावला आहे. नेरळ माथेरान मिनिट्रेन मार्गात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. हि सेवा बंद असल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here