माझ्या विरोधात रामदास कदमांनी षडयंत्र रचले खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा आरोप

0
277

महामार्ग अधिकाऱ्यांना दमदाटी आणि नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधल्याप्रकरणी अटकेत असलेले मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची शुक्रवारी जामिनावर सुटका झाली. जामिनावर सुटका होताच वैभव खेडेकर यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रामदास कदमांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. मी कुठेतरी त्यांना राजकारणात अडचणीचा ठरत होतो आणि माझं नगराध्यक्ष पद काहींना अडचणीचं वाटत होते, त्यामुळे मला तीन महिने आत ठेवून माझं नगराध्यक्ष पद काढून घ्यायचे आणि आपला माणूस त्या ठिकाणी बसवायचा आशा पद्धतीचं राजकारण झाल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. २९ जून २०१९ रोजी नवीन जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान वैभव खेडेकर आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जगबुडी पुलाच्या जोड रस्त्याबाबतच्या निकृष्ट कामाला अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांना पुलाच्या रेलिंगला बांधून ठेवले. या प्रकरणामुळे ९ जुलै रोजी वैभव खेडेकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here