महिला नेतृत्वाच्या विकासासाठी ‘महिला आरक्षण विधेयक’ ( नारी शक्ती वंदन विधेयक) महत्त्वाचे : अभाविप.

0
170

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गोवा भारतीय संसदेद्वारा ‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर करून देशातील महिला नेतृत्वाला योग्य स्थान देण्याच्या दिशेने एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे या घटनेचे स्वागत करते. महिलांचे कुशल नेतृत्व समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणत आहे, अशा परिस्थितीत लोकसभा आणि राज्यसभेसह राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांचे योग्य प्रतिनिधित्व मिळणे ही आनंदाची बाब आहे.

समाजाच्या सर्व क्षेत्रात महिलांना योग्य स्थान मिळावे यासाठी विविध प्रयत्न केले पाहिजेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अनेक प्रयत्न करत आहे ज्याद्वारे महिलांना देशात समान संधी मिळू शकतात. यामुळे महिलांच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीत सकारात्मक बदल घडून येतील आणि त्या सशक्त राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गोवा संयोजक कु.धनश्री मांद्रेकर म्हणाल्या, “नवीन संसदेच्या श्रीगणेशा च्या वेळी केंद्र सरकार कडून अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या महिला आरक्षण विधेयकाला संसदेच्या दोन्ही सदनात मंजूर केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करते. 2018 मध्ये अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संसद, विधानसभा आणि विधानपरिषदेत महिलांना 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. केंद्र सरकारकडून महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्याच्या दिशेने योग्य पावले उचलली आहेत. महिला आरक्षण विधेयक नव्या भारतातील महिला नेतृत्वाला सकारात्मक दिशा देणारे ठरेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here