महाराष्ट्र कॅश्यु असोसिएशनमार्फत सिंधुदुर्ग साठी काजू बी दर निश्चित..! बागायतदारांनी व्यक्त केली नाराजी

0
238

 

महाराष्ट्र कॅशु मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे निश्चित झाल्यानुसार काजू कारखानदार, व्यापारी यांच्याकडून दोडामार्ग ते बांदा भागातील काजू १०० रु. प्रति किलो, सावंतवाडी ते कणकवली भागातील काजू ९० रु. प्रति किलो तर वेंगुर्ला व इतर काही ठिकाणचा काजू ८५ रु. प्रति किलो या दराने खरेदी करणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी स्पष्ट केले. काजू बी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक न करता ५ ते ३ रु. कमिशन ठेवूनच तो खरेदी करावा असेही त्यांनी सांगितले.

दोनच दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काजू कारखानदार,बागायतदार यांची संयुक्तिक बैठक झाली होती. या बैठकीत सिंधुदुर्गात तयार होऊन बागायतदाराच्या घरात पडून असलेल्या काजूचे काय करायचं असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर मार्ग म्हणून हे दर ठरविण्यात आले आहेत.

दरम्यान काजूचे हे दर बागायदारांवर अन्यायकारक असल्याची भावना बागायतदारांनी व्यक्त केली आहे. कणकवली तालुक्यातील पियाळी गावातील बागायतदार गौतम नारायण तांबे यांनी बोलताना सांगितले की कोरोना सारख्या महामारीचा फायदा घेऊन शेतकरी, बागायतदार अडचणीत असताना त्याला मदतीचा हात देण्यापेक्षा त्याला उध्वस्त करण्याचा हा कट आहे. एकंदरीत शेती बागायती व्यवस्था उध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here