महाराष्ट्रातील नांदेडमध्ये वाळूमाफियांचा तहसीलदाराला गाडीसह जीवंत जाळण्याचा प्रयत्न

0
229

बंद पडलेल्या वाळू घाटावरून अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या माफियावर कारवाई करण्यास गेलेल्या देगलूरच्या तहसीलदारांवर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अरविंद बोळगे, असे या तहसीलदाराचे नाव आहे. त्यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांना अगोदर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना गाडीसह जीवंत जाळण्याचा प्रयत्न माफियांनी केला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. वाळूचा अवैध उपसा होत असल्याची माहिती देगलूर तहसीलदार अरविंद बोळंगे यांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर बोळगे हे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास जुना पेट्रोलपंपसमोर गेले असता, तेथे थांबलेले वाळू माफिया बाबर देसाई, शेख अहेमद यांनी गैरमंडळी जमा करून तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांना जीवंत जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी उपरोक्त वाळू माफियावर कलम 307, 353 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस निरीक्षक चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here