महाराष्ट्रातील कोविड हॉस्पिटल सक्तीने कॅशलेस करा, आम.नितेश राणे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

0
217

सिंधुदुर्ग – आरोग्य विमा असून सुद्धा राज्यातील काही कोविड हॉस्पिटल रुग्णांना कॅशलेस सुविधा देत नाहीत. आरोग्य विमामध्ये किट व निर्जतुकीकरण चे पैसे ग्राहय धरले जात नाहीत ते वेगळे आकारले जातात त्याचा भुर्दंड जपचार घेणाऱ्या व्यक्तीला बसतो. प्रायव्हेट कोविड हॉस्पिटल मध्ये दाखल होताना ५० हजार ते एक लाख पर्यंत अनामत रक्कम आकारली जाते. काही कोविड हॉस्पिटल मध्ये तर रुग्णाच्या नातेवाईकाना इंजेक्शनची व्यवस्था करावयास सांगतात.त्यामुळे रूग्णाचे नातेवाईकांना कोरोना संसर्ग होतो.या सर्व परिस्थतीचा विचार करता राज्यातील कोविड हॉस्पिटल सक्तीने कॅशलेस करा. तसेच किट व निर्जतुकीकरणाचे पैसे आरोग्य विमामध्ये समाविष्ट करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलेल्या पत्रात आम.नितेश राणे यांनी खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना संसर्ग रुग्णाच्या बाबतीत घडणाऱ्या घटना आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न कोणते आहेत हे विशद केले आहे.जगात गेल्या काही महिन्यांपासुन कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे . या महामारीवर अद्याप कोणताही सध्यातरी उपाय काढण्यात आला नाही. गेल्या पाच महिन्यापासुन महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन हा एकच पर्याय राबविला जात आहे. त्यामुळे राज्यात बहुताश लोकाचा रोजगार गेला आहे. ज्यांच्याकडे रोजगार आहेत त्यांना पगार कपात होऊन मिळत आहे . काही ठराविकच कपन्या किंवा ऑफिसमध्ये पूर्ण पगार देत आहेत. अशा परिस्थितीत जे कोरोना बाधित रुग्ण होत आहेत त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्याव लागलं आहे. अगोदरच कोरोना महामारिमुळे संसर्ग झालेल्या नागरिकांना या अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. तरी आपणास विनंती आहे की राज्यातील सर्व कोविड हॉस्पिटल सक्तीने कॅशलेस करण्यात यावेत. तसेच किट व निर्जतुकीकरणचे पैसे आरोग्य विमामध्ये समाविष्ट करावेत , आज काहीजणांना आरोग्यवीमा असुनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही . याकाळात उपचारासाठी सर्व सामान्य जनतेकडे ४ ते ५ लाख रुपये कोठून येणार. वरील सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्वरित सर्व कोविड हॉस्पिटल सक्तीने कॅशलेस करण्यात यावेत. तसेच किट व निजतुकीकरणाचे पैसे आरोग्य विमामध्ये समाविष्ट करण्याचे संबंधित रुग्णालयाना आदेश करावेत अशी मागमी आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here