महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, मंत्री नरहरी झिरवळ नॉट रिचेबल

0
2

मुंबई – सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकारानंतर विरोधकांनी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईमुळे ते अडचणीत आले आहेत. झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांनी ५० हजाराची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली आहे. चक्क मंत्रालयात लाचखोरी घटल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here