पणजी : कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप करत, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि चौकशीला सामोरे जाण्यास सांगितले.
गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी आज गोविंद गावडे यांनी विशेष निधीचा गैरवापर केल्या प्रकरण आरोप केल्याने, त्या संदर्भात पाटकार बोलत होते.
‘गेल्या दहा वर्षांपासून भाजप सरकार भ्रष्ट असल्याचे आम्ही वारंवार सांगत आहोत. आज सभापती रमेश तवडकर यांनीही कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यांनी ‘विशेष अनुदाना’चा गैरवापर केला आहे, तसे कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात ९० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप याच मंत्र्यावर आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात भाजप अपयशी ठरला आहे. ते भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देत आहेत,’’ आसा आरोप पाटकर यांनी केला.
“याआधी आम्ही मंत्री मॉविन गुदिन्हो, रोहन खवंटे, विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचार उघडकीस आणले आहेत. या सर्वांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, असे पाटकर म्हणाले.
गावडे घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप सभापती रमेश तवडकर यांनी केल्यावर भाजपने कारवाई करावी, असे ते म्हणाले. ते म्हणाले, “सभापतींनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या त्यांच्याच पक्षातील सदस्याचा पर्दाफाश करण्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल,” असे ते म्हणाले.
हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे असे पाटकर म्हणाले.