भाजपा खासदार नारायण राणे वैफल्य ग्रस्त, शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा पलटवार

0
101

सिंधुदुर्ग – राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणात आले मात्र त्यांच्या दौऱ्यात नारायण राणेंना दुर ठेवण्यात आल्यामुळे त्या द्वेषातून राणे उद्धव ठाकरेंवर आरोप करत असल्याचा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर पलटवार केला आहे. महाराष्ट्र सरकार निसर्ग चक्रिवादळात दिलेल्या नुकसान भरपाई प्रमाणेचं मदत देईल परंतु केंद्राकडून किती मदत मिळाली याचा राणेंनी विचार करावा. भाजप मधे आणि लोकांमधे राणेंची किंमत राहीली नाही म्हणून राणें वैफल्य ग्रस्त झाल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना वैभव नाईक पुढे म्हणाले, राणे निसर्ग वादळातील नुकसानीला केंद्राकडून किती मदत मिळणार यावर न बोलता राणे उद्धव ठाकरे यांच्यावर आपला आहेत. खरतर उद्धव ठाकरे यांच्या कामाचे सुप्रीम कोर्टाने कौतुक केलेले आहे. केंद्राने उद्धव ठाकरे यांच्या कामाचा आदर्श घ्यावा असं कोर्टाने म्हटले आहे. निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ कोकणला भेट दिली. ज्या दिवशी वादळ झालं तेव्हा ते इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. इथल्या परिस्तितीची ते माझ्याकडून आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्याकडून ते माहिती घेत होते. असेही वैभव नाईक म्हणाले आहेत.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. राऊत नेहमी राज्यपाल आणि पंतप्रधानांवर टीका करतात. ही पदे घटनात्मक आहेत. त्यांचा सातत्याने अपमान केला जातो. आधी सरकारच्या झालेल्या कामांची प्रतिक्रिया घ्या. कुणाला हनुमान बनवायचं आणि कुणाला गणपती करायचं हे तुम्ही करता, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात जर कुठे भुताटकी असेल तर ती मंत्रालय, वर्षा आणि मातोश्रीवर आहे. तेथे शांती करा. मन शांती करा, शांती यज्ञही करा, असं सांगतानाच राऊतांची भाषा ही योग्य नाही. राज्यकर्त्यांना शोभणारी ही भाषा नाही, अशी टीका राणेंनी केली होती.

राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत. त्यांच्या कोकण दौऱ्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. दुष्काळ, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात घरोघरी जावं लागतं. पंचनामे करावे लागतात, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्री ज्या विमानतळावर उतरले ते विमानतळ आधी सुरू करा. ज्या विमानतळाला परवानगी नाही, त्या ठिकाणी मुख्यमंत्री उतरतातच कसे?, असा सवाल ही राणेंनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here