सिंधुदुर्ग – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणी राष्ट्रवादी तर्फे पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वर केलेल्या जहरी टिके संदर्भात भाजपाचे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज सिंधुदुर्गात ठिकठिकाणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत जोडो मार आंदोलन केले. दोन दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांच्यावर पडळकर यांनी शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना अशी टीका केली. यानंतर याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.