भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांची निवड

0
291

 

सिंधुदुर्ग – जिल्हा भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा कुडाळ तालुक्यातील कसाल / जिल्हा परिषद मतदार सांघाचे सदस्य अंकुश जाधव यांची निवड करण्यात आली आहे.याबाबतचे पत्र आज जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी त्यांना प्रदान केले.
श्री.जाधव हे गेली अनेक वर्षे सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी विविध पदे भूषविललेली आहेत.पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना ही संधी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here