बेजबाबदार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चाकूरकर यांचा राजीनामा घेऊन चौकशी करा आमदार नितेश राणे यांची मागणी

0
222

 

सिंधुदुर्ग – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चाकूरकर यांनी संपूर्ण जिल्हयाचे आरोग्य धोक्यात आणले आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नर्सला लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये सेवा देण्यासाठी नियुक्त केले होते. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडिंग होण्याची भीती निर्माण झाली आहे. खरं तर त्या नर्सचा स्वॅब घेतल्यानंतर तिला आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवायला हवे होते. पण तिला लहान मुलांच्या कक्षात ड्युटी देऊन जिल्हा प्रशासनाने त्या लहान मुलांसह त्यांच्या पालकांचा जीव धोक्यात आणला आहे. त्यामुळे या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे बेजबाबदार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चाकूरकर यांचा राजीनामा घेवून त्यांच्या कृत्याची चौकशी करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आज केली.

जनतेचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर कारवाई करून तातडीने चौकशी करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे आमदार राणे म्हणाले. आरोग्य विभागाचा बेजबाबदार कारभार चालू आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आव्हान करतो, की हा विषय राजकारणाचा नाही. सर्वांच्या जीवावर बेतणारा प्रकार आहे. अशा घटनेने सिंधुदुर्ग उध्वस्त होण्याची भीती आहे, तेव्हा चिकिला पाठीशी घालू नका, असे आवाहनही आमदार नितेश राणे यांनी सर्व पक्षीयांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here